महिलेवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:58+5:302021-03-27T04:25:58+5:30
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथील नवीन इंगळी वसाहतीमध्ये पीडित महिला भाड्याच्या घरात राहते. सुनील ढेंगे याची पीडितेच्या भावाशी ...

महिलेवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथील नवीन इंगळी वसाहतीमध्ये पीडित महिला भाड्याच्या घरात राहते. सुनील ढेंगे याची पीडितेच्या भावाशी ओळख असल्याने त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. यातून या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर संबंधित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ही महिला गर्भवती राहिली. यावेळी ढेंगे याने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडित महिलेने ढेंगे याच्याकडे लग्नाबाबत वारंवार विचारणा केली; मात्र त्याने लग्नाला टाळाटाळ केली आहे. पीडित महिलेने हुपरी पोलीस ठाण्यात येवून ढेंगे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.