पेरीड येथे ट्रक लुटणाऱ्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:32+5:302021-04-13T04:22:32+5:30

पोलिसांनी संशयित आरोपी विष्णू पारळे यास अटक करून शाहूवाडी कोर्टात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ...

Crime against two truck robbers at Perid | पेरीड येथे ट्रक लुटणाऱ्या दोघांवर गुन्हा

पेरीड येथे ट्रक लुटणाऱ्या दोघांवर गुन्हा

पोलिसांनी संशयित आरोपी विष्णू पारळे यास अटक करून शाहूवाडी कोर्टात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. संशयित आरोपी नथुराम कांबळे पसार झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली महिती अशी, रविवार, ११ एप्रिल रोजी ट्रक चालक चंद्रकांत गुलाब जाधव, वय ३८, रा. उब्रज, ता. कराड, जि. सातारा हे ट्रक क्रमांक (एमएच १३ एएक्स- ४३६१) मध्ये चिरा भरून कोल्हापूर - रत्नगिरी मार्गावरून मलकापूरहून कराडकडे जाते होते. ट्रक पेरीड गावच्या हद्दीतील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयासमोरून जात असताना नथुराम कांबळे याने ट्रक अडविला. मी तहसीलदार आहे. तुझ्याकडे चिरा वाहतूक करण्याचा परवाना आहे का, असे विचारले. चालकाने परवाना दाखविला असता परवाना खोटा आहे. असे म्हणून चालकाला मारहान करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये घेऊन पळून गेला. जमलेल्या नागरिकांनी संशयित आरोपी विष्णू पारळे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विष्णू पारळे यास अटक करून शाहूवाडी न्यायालयात दाखल केले असता दि. १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

Web Title: Crime against two truck robbers at Perid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.