प्रतिबंधक अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 07:18 PM2021-05-03T19:18:25+5:302021-05-03T19:23:31+5:30

CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित आदेश जारी केला आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात विकास कामांचा शुभारंभ केला. याप्रकरणी तिघाजणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अभिषेक विजय देवणे (रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ), जयवंत अशोकराव हारुगले, गजानन भुर्के (रा. दोघेही मंगळवार पेठ) या तिघा संशयितांचा समावेश आहे.

Crime against three persons for violating the Prevention Act | प्रतिबंधक अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हा

प्रतिबंधक अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिबंधक अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हापरवानगी न घेता विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित आदेश जारी केला आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात विकास कामांचा शुभारंभ केला. 

याप्रकरणी तिघाजणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अभिषेक विजय देवणे (रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ), जयवंत अशोकराव हारुगले, गजानन भुर्के (रा. दोघेही मंगळवार पेठ) या तिघा संशयितांचा समावेश आहे.

शहरवासीयांना मूलभूत सुविधांकरिता मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांनी शहर विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात बुधवारी (दि. २८) रोजी विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधित आदेश जारी केला आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत, कोणतीही पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता कार्यक्रम घेतला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंधक, महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना या नियमांचा भंग केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime against three persons for violating the Prevention Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.