प्रतिबंधित आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दहाजणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:37+5:302021-06-21T04:16:37+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश जारी केले आहेत. तरीसुद्धा पोलिसांची परवानगी न घेता ...

प्रतिबंधित आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दहाजणांविरोधात गुन्हा
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश जारी केले आहेत. तरीसुद्धा पोलिसांची परवानगी न घेता जमाव जमवून आंदोलन केले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षांसह दहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश जारी केले आहेत. असे असतानाही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आम आदमी पार्टीतर्फे अयोध्या येथील रामजन्मभूमी ट्रस्टमध्ये झालेल्या घोटाळ्यात सामील झालेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, याकरिता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातील हनुमानाला साकडे घालून आंदोलन करत कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी नितीन पोवार (पोलीस काॅन्स्टेबल, जुना राजवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रामचंद्र देसाई (वय ४६, रा. वर्षानगर), उत्तम प्रकाश पाटील (वय २५, रा. ताराबाई पार्क), संतोष घाटगे (वय ३८, रा. दौलतनगर), सुरज बबनराव सुर्वे (वय ३२, रा. सुभाषनगर), संतोष रामा चलवंडी (वय ३५, रा. शास्त्रीनगर), बाबुराव तानाजी बाजारी (वय ५३, रा. बोंद्रेनगर), राज अरुण कोरगावकर (वय २१, रा. माऊली पुतळा, राजारामपुरी), विजय चंदर भोसले (कळंबा एलआयसी काॅलनी), अमित राजेश चव्हाण (वय २६, रा. कंदलगाव), दत्तात्रय परसू सुतार (वय ४१, रा. दौलतनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.