इचलकरंजीत जुगारप्रकरणी जागा मालकासह सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:35+5:302021-09-10T04:31:35+5:30

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील सनी कॉर्नर परिसरात तीन पानी जुगार खेळत असल्याप्रकरणी जागा मालकासह सहा जणांवर शिवाजीनगर ...

Crime against six persons including land owner in Ichalkaranji gambling case | इचलकरंजीत जुगारप्रकरणी जागा मालकासह सहा जणांवर गुन्हा

इचलकरंजीत जुगारप्रकरणी जागा मालकासह सहा जणांवर गुन्हा

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील सनी कॉर्नर परिसरात तीन पानी जुगार खेळत असल्याप्रकरणी जागा मालकासह सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सात हजार १८० रुपये रोख रक्कम, चार मोबाईल, दोन मोटारसायकली व पत्त्याची पाने असा एकूण एक लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत माहिती अशी, कबनूर परिसरात राहणारे जागा मालक पोपट रोहीदास लोंढे (वय ४९, रा सनी कॉर्नर मागे) राहत्या घरासमोर जिन्याच्या आडोश्यास पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमोल मोहन हजारे (वय ३८, रा. षटकोन चौक, बाळनगर), सुनील दत्तात्रय सुतार (४९), अजमेर गजबर फकीर (५०, दोघे रा. सनी कॉर्नरमागे, कबनूर), अमजद रज्जाक मुजावर ६२, रा. अष्टविनायक कॉर्नर) व विनायक सुभाष भंडारी (रा. केटकाळेनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime against six persons including land owner in Ichalkaranji gambling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.