तीनपानी जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:33+5:302021-09-13T04:23:33+5:30
कोल्हापूर : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे पाण्याच्या टाकीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ...

तीनपानी जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर गुन्हा
कोल्हापूर : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे पाण्याच्या टाकीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. त्यामध्ये एका नगरसेविकेच्या पतीचा समावेश आहे. त्यांच्याकडून कार, पाच मोटारसायकली, सहा मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख ६९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
नगरसेविकेचा पती प्रधान मायाप्पा माळी (वय ५४, रा. सोलगे मळा), संजय बजरंग तोडकर (४२, रा. खोतवाडी), विजय महावीर पाटील (३५, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), रामबहाद्दूर शांताराम वर्मा (६०, रा. पुजारी मळा), प्रमोद बाळासाहेब परीट (४४, रा. समर्थनगर, तारदाळ) व अनिल बापू नर्मदे (४७, रा. चंद्रेश्वरी सोसायटी, खोतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, खोतवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ संदीप पांडुरंग माने यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वरील सहाजणांवर कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला.
१२०९२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत तीनपानी जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
१२०९२०२१-आयसीएच-०६
त्यांच्याकडून कार, पाच मोटारसायकली, सहा मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख ६९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.