फुलेवाडी रिंगरोड परिसरात मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:48+5:302021-05-22T04:21:48+5:30

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात ...

Crime against one in Phulewadi ring road area | फुलेवाडी रिंगरोड परिसरात मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

फुलेवाडी रिंगरोड परिसरात मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याबाबत राहुल शरद कांबळे (वय ३२, गुरुप्रसाद अपार्टमेंट, बाळासाहेब इंगवले, नगर, फुलेवाडी रिंगरोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. ओमकेश उमेश आलमेकर (रा. फुलेवाडी, रिंगरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. दुचाकी पार्किंग करण्यावरून फिर्यादीस संशयित आलमेकर यांनी शिवागाळ व लाथाबुक्क्यांनी प्रथम मारहाण केली. त्यांनतर पडलेल्या लोखंडी सळीने कपाळाच्या डाव्या बाजूस मारहाण करीत दुचाकीचेही नुकसान केले. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले. मारहाण करून जखमी करीत दुचाकीचे नुकसान केल्याबद्दल कांबळे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. तपास अंमलदार कांबळे करीत आहेत.

Web Title: Crime against one in Phulewadi ring road area