मिरवणूक काढल्याबद्दल हमीदवाडात चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:11+5:302021-09-18T04:27:11+5:30

मुरगूड :- साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असताना याचे उल्लंघन करून हमीदवाडा, ता.कागल येथे विघ्नहर्ता तरुण ...

Crime against four in Hamidwada for taking out a procession | मिरवणूक काढल्याबद्दल हमीदवाडात चौघांवर गुन्हा

मिरवणूक काढल्याबद्दल हमीदवाडात चौघांवर गुन्हा

मुरगूड :- साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असताना याचे उल्लंघन करून हमीदवाडा, ता.कागल येथे विघ्नहर्ता तरुण मंडळाचे कार्यकर्ते मिरवणूक काढत होते. मुरगूड पोलिसांनी या मंडळाच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे. अनंत चतुर्थी दिवशी कोणीही मिरवणूक काढू नये अन्यथा अशांवर कडक कारवाई करण्याचा सूचना सपोनि विकास बडवे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. हमीदवाडा येथील विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दाखविल्या. ठाणेवाडी चौक ते खडा चौकदरम्यान मिरवणूक आली असता पोलिसांनी ती रोखली. दरम्यान, पोलीस कर्मचारी सचिन आनंदराव निकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद मारुती ठाणेकर, उदय गणपती ठाणेकर, श्रीकांत अशोक गोधडी, संतोष दत्तात्रय ठाणेकर या चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Crime against four in Hamidwada for taking out a procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.