युवतीला पळविल्याचा कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 22, 2014 23:35 IST2014-07-22T23:22:03+5:302014-07-22T23:35:34+5:30

बोरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

Crime against the constable of catching the girl | युवतीला पळविल्याचा कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

युवतीला पळविल्याचा कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन युवतीला पळवून नेल्याच्या आरोपावरून बोरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल झाला.इम्रान दस्तगीर मेटकरी (वय ३०, रा. बोरगाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. नागठाणे येथील एका वीस वर्षीय युवतीला इम्रानने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. गेल्या काही दिवसांपासून इम्रान आणि संबंधित युवती गायब आहेत. दोघांचेही मोबाईल बंद आहेत. त्यामुळे त्यांचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
इम्रान हा बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असून, तो पोलीस दलाचा फुटबॉल खेळाडू आहे. शुक्रवार (दि. १८) पासून त्याने आजारपणाची रजा घेतली असून, त्या दिवसांपासून तो गायब आहे. कॉन्स्टेबलनेच युवतीला पळवून नेल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against the constable of catching the girl