जयसिंगपुरात दोघा नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:09+5:302021-02-21T04:48:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशाचे उल्लघंन करून जयसिंगपुरात म्हशी पळवण्याच्या शर्यती आयोजित केल्याप्रकरणी दोघा नगरसेवकांसह २० जणांवर पोलिसांनी गुन्हा ...

जयसिंगपुरात दोघा नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशाचे उल्लघंन करून जयसिंगपुरात म्हशी पळवण्याच्या शर्यती आयोजित केल्याप्रकरणी दोघा नगरसेवकांसह २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील शाहूनगर परिसरात शनिवारी विनामास्कचा वापर, सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी करूनम्हशी पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी २८ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेला आहे. असे असतानाही या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी शैलेश चौगुले, गुंडाप्पा पवार, संयोजक गणेश सूर्यवंशी, अक्षय मासाळ, अभिजित लोहार, राजू हरणे, आकाश ऊर्फ दादू पवार, बबलू नलवडे, मनोज कुरणे, सतीश कोळेकर, लखन नलवडे, सागर पवार, सुनील सुतार, पवन सुतार, अनिकेत मोरे, रोहित चौगुले, विकास नलवडे, अशोक भोसले, अमोल गवळी, नितीन शेलार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.