शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अर्जुन तेंडुलकरने नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांचं घेतलं दर्शन-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:48 IST

मंदिर परिसरात अर्जुन तेंडुलकरला बघण्यासाठी मोठी गर्दी

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी  : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी आज, मंगळवारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेऊन प्रार्थना केली. ह्याआधीही सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघे पिता पुत्र नृसिंहवाडी इथे दर्शनासाठी आले होते. मात्र आता एकटाच अर्जुन दत्त दर्शनासाठी आला होता.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडी इथील दत्त मंदिरात आज दुपारी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी दत्त दर्शन घेतले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर अर्जुन दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहचला आहे. दत्त दर्शन झाल्यानंतर प्रार्थना करण्यात आली. यावेळी दत्त देवस्थान चे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, स्वरुप पुजारी यांनी श्री ची प्रतिमा देवून स्वागत केले. या आधी पहाटे सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर हे पिता-पुत्र दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अर्जुनने दर्शन घेतले. मंदिर परिसरात अर्जुन तेंडुलकरला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी अर्जुनने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे  टाळली.

अर्जुनची IPL कारकीर्द अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला होता. पण अर्जुनला दुखापत झाली आणि त्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकला. त्याच्या जागी सिमरजीत सिंगला संघात संधी मिळाली. यानंतर मुंबई इंडियन्सने २०२२ च्या लिलावात ३० लाखांत त्याला पुन्हा घेतले. अर्जुनने १६ एप्रिल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. अर्जुनने या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या होत्या. मुंबई इंडियन्सने गेल्या तीन वर्षांत एकूण ४४ सामने खेळले आहेत. यामध्ये अर्जुनला केवळ ५ सामन्यात संधी मिळाली. ५ सामन्यांमध्ये त्याने ९.५० च्या इकॉनॉमीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने या कालावधीत ९५ धावा केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArjun Tendulkarअर्जुन तेंडुलकरDatta Mandirदत्त मंदिर