त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम मानवी कानाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:21+5:302021-08-20T04:29:21+5:30
कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च' मधील स्टेम सेल विभागातील डॉ. मेघनाद जोशी यांनी ...

त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम मानवी कानाची निर्मिती
कसबा बावडा:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च' मधील स्टेम सेल विभागातील डॉ. मेघनाद जोशी यांनी प्रयोगशाळेत त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम मानवी कान बनविण्यात यश मिळवले आहे. जनुकीय समस्या व अन्य कारणांनी कान नसलेल्या व्यक्तीना हे संशोधन वरदान ठरणार आहे.
बोकडाच्या कानाचा कुर्चा वापरून द्रवरूप पदार्थ तयार करून त्याद्वारे त्रिमिती छपाईचा वापर करून मानवी कान तयार करण्यात डॉ. जोशी यांना यश आले आहे. या कृत्रिम कानाचे उंदरामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे. डॉ. जोशी यांचे संशोधन प्लॅस्टिक सर्जरीवर उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये कृत्रिम कानामध्ये स्टेम सेलचा वापर करून पूर्णपणे विकसित कृत्रिम कान तयार करणे शक्य होणार आहे. डॉ. मेघनाद जोशी यांचा हा संशोधनपर शोधनिबंध 'बायोमेडिकल मटेरिअल्स' या जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. फोटो : १९ डॉ मेघनाद जोशी