शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

राजर्षी शाहूंच्या विचारांनाच तडा, कोल्हापूर हिंदुत्ववादी शहर भासविण्याचा प्रयत्न

By विश्वास पाटील | Updated: June 9, 2023 12:54 IST

कोल्हापूरच्या माथी असलेला पुरोगामित्वाचा गुलाल पुसून टाकण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून पद्धतशीरपणे सुरू

विश्वास पाटीलकोल्हापूर : वादग्रस्त स्टेटस लावल्याच्या प्रकरणावर कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.७ जून) हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्यामध्ये विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक झाली. ही दगडफेक घरावर नव्हे तर कोल्हापूरने आजपर्यंत जपलेल्या सामाजिक सलोख्यावर आणि एकोप्याने राहण्याच्या भावनेवर झाली आहे. कोल्हापूरच्या माथी असलेला पुरोगामित्वाचा गुलाल पुसून टाकण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून पद्धतशीरपणे सुरू आहे.. बुधवारची घटना त्याचाच भाग आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि व्यवहार बळकट करायचा की आता जे सुरू आहे त्याच्याकडे नुसते पाहत राहायचे याचा विचार आम्ही कोल्हापूरकर असे अभिमानाने म्हणणाऱ्या लोकांसमोर आहे. आपण उठसुठ जे लई भारी कोल्हापूर म्हणतो, त्या लई भारी मध्ये कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याची, शांततेची, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा समाविष्ट आहे. कोल्हापूर जगात भारी का आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हे कोल्हापूरकरांचे सगळ्यांना बरोबर घेवून जगणे आहे. म्हणून कोल्हापूर मोठे आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.हिंदु जनजागृती मोर्चातून तापवलेले समाजमन, गावोगावच्या तरुणांना केरळा स्टोरी चित्रपट दाखवून चेतवलेली द्वेषाची भावना, हेरले, इचलकरंजी, पन्हाळा येथील कांही घटना यांतून अस्वस्थता वाढली होती. त्यातूनच यांना धडा शिकवायचा ही भावना वाढीस लागली.

गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर हे पुरोगामी शहर नाही तर ते हिंदुत्ववादी आहे ठसवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. कालच्या मोर्चाच्या अनेक सोशल पोस्टवर तसाच प्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला.. तुम्ही हिंदू असाल तर शिवाजी चौकात या असेच आवाहन करण्यात आले होते. एका अर्थाने हिंदू खतरे मे है असे सांगून समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होता. भडकलेला समाज मग पोलिसांच्या नियंत्रणात ही कसा राहत नाही हेच बुधवारी कोल्हापूरने अनुभवले. अशा जमावाला सोशल मीडियावर भावना भडकवणारे आवाहन करून गोळा करण्यासाठी फार अक्कल लागत नाही..तो जमाव नियंत्रित करण्याची ताकद नेतृत्वात असावी लागते..बुधवारच्या मोर्च्यात जे कुणी नेते होते ते नंतर गायब झाले..आता पोलिसांनी गोरगरिबांची पोरं ताब्यात घेतली आहेत..त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे..

या देशातील मुस्लिम हे भारताचे नागरिक नाहीत ते या देशाची शत्रूच आहेत असे विष सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मनात फोनवर बिंबवले जात आहे..त्याला उत्तर किंवा त्यातील काय योग्य आणि काही चुकीचे आहे हे सांगणारी कोणतीच यंत्रणा नाही. काँग्रेस किंवा अन्य पक्षाकडे आपलीच मुले या विकारी प्रचारापासून रोखण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. कुणीतरी एखाद्या समाजकंटकाने चुकीचे कृत्य केले तर त्याची शिक्षा साऱ्या समाजाला देण्याचा नवा धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. बुधवारच्या बंदमध्ये ज्यांची घरे, दुकाने किंवा वाहनांची तोडफोड झाली त्यातील एकानेही चुकीचे कृत्य करणाऱ्यांचे समर्थन केलेले नाही. पण त्यांना त्याचा नाहक त्रास मात्र झाला.कोल्हापूर ही राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशभर एक पुरोगामी शहर अशी ओळख आहे. कोल्हापूर उत्तर च्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची लाट रोखण्याचे काम याच नगरीने करून दाखवले आहे.. त्यामुळे कोल्हापुरात बुधवारी जो प्रकार झाला तो ऐकल्यानंतर राज्यभरातून कोल्हापुरात असे कसे काय घडू शकतं अशी प्रतिक्रिया उमटली. कोल्हापूरची सामाजिक वीण ही नेहमीच सामाजिक एकोप्याची राहिली आहे.कोणत्याही सामाजिक कामात आणि सणातही मुस्लिम समाज इतर सर्व समाजाबरोबर एकरूप होऊन गेला आहे. कोरोना काळात कोण मृतदेहाकडे बघत नव्हते तेव्हा याच समाजातील कार्यकर्त्यांनी आपला वाढवडिलांवर अंत्यसंस्कार केले आहेत..मराठा आरक्षण मोर्च्यावेळी याच समाजाने जिल्ह्यातून आलेल्या छत्रपतींच्या मावळ्यांना उस्फुर्तपणे खाऊ घातले होते..याची तरी जाणीव किमान दगड फेकणाऱ्यांनी ठेवायला हवी होती. निवडणुकीच्या राजकारणासाठी कोण असल्या घटनाना हवा देत आहे का याच्याही मुळाशी जाण्याची गरज आहे..निवडणूक होईल, राजकारण होईल पण सामाजिक सदभावाला गेलेला तडा कोल्हापूरला परवडणारा नाही याचे भान सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे.छत्रपती घराण्याकडे पालकत्व..

डाव्या चळवळीकडे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर समाज ज्यांच्या शब्दाला मान देईल असे नेतृत्व नाही. त्यामुळे कोल्हापूरची मूळ ओळख पुसून टाकणारे हे आव्हान कसे पेलायचे हा प्रश्न आहे. या स्थितीत आता कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची जबाबदारी जास्त वाढते..त्यांनीच कोल्हापूरच्या सर्व समाजाची एकजूट करून हे धर्मांधतेचे आव्हान परतवले पाहिजे.

बंदची दोन कारणे होती ती अशी : इमरान नायकवडी या तरुणाने हिंदू समाजातील मुलीला फूस लावून पळवून नेले आणि या प्रकरणात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.मुळात हे प्रकरण लव जिहाद या पद्धतीचे नाही. दोन-तीन वर्षापासून त्या दोघात प्रेम संबंध होते. त्या मुलीशी इमरान नायकवडी याने लग्न करणे ही मुलीच्या कुटुंबीयांची अगतिकता होती. असे असताना या प्रकरणाला लव जिहाद चे स्वरूप जाणीवपूर्वक देण्यात आले.

दुसरे कारण म्हणजे सदर बाजार मधील एका मुस्लिम तरुणाने औरंगजेब याचे पोस्टर स्टेटसला लावले. त्याचे अनुकरण मटन मार्केट परिसरातील एका तरुणाने केले. हा शाळेतील मुलांचा ग्रुप आहे. त्यातील काही मुले अल्पवयीन आहेत.पण तरीही ज्याने ही कृत्य केले आहे. त्यांना तातडीने शोधून काढणे आणि कारवाई करणे ही जबाबदारी पोलिसांची होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करणे आवश्यक होते पण तसे घडलेले नाही. यात गंमत अशी आहे ज्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले त्यांचाच विचार मांणणारे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे त्यामुळे या अशा प्रकरणात कारवाई वेळेत झाली नसेल तर हा मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही समाजाचा दोष नव्हे. पोलिसांच्या चुकांची किंवा त्यांनी कारवाई केली नाही म्हणून मोर्चा काढून दगडफेक करणे गोरगरिबांची दुकाने फोडणे वाहनांचे नुकसान करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीHindutvaहिंदुत्व