शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

‘सीपीआर’चा अपघात विभाग होणार सुसज्ज, दहा दिवसांत स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:53 IST

सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज्ज विभागामध्ये रुग्णांसाठी ३० बेड, डॉक्टर व नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.

ठळक मुद्दे‘सीपीआर’चा अपघात विभाग होणार सुसज्ज, दहा दिवसांत स्थलांतरितमुख्य प्रवेशद्वारनजीक इमारतीचे काम सुरू

कोल्हापूर : सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज्ज विभागामध्ये रुग्णांसाठी ३० बेड, डॉक्टर व नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सीमाभागातील अनेक रुग्णांचा ओघ ‘सीपीआर’कडे मोठ्या प्रमाणात आहे. अपघातग्रस्त रुग्णांसह तातडीच्या उपचारासाठी सर्वच रुग्णांसाठी ‘सीपीआर’मधील अपघात विभाग २४ तास सज्ज असतो. त्यामुळे येथे रुग्णांवर तातडीने उपचार केले जातात. अनेक रुग्णांना नवसंजीवनी देणारा विभाग म्हणून याला संबोधले जाते.दिवसभर या अपघात विभागात रुग्णांचा ओघ सुरूच असतो. त्यामुळे येथे गर्दी ही नित्याचीच बाब बनली आहे. रुग्णांचा दैनंदिन वाढता ओघ आणि या विभागाची अपुरी जागा यांमुळे डॉक्टरांना रुग्णांवर तातडीचे उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याचा विचार करता हा विभाग आणखी सुसज्ज करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी सीपीआर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या दगडी इमारतीत हा अपघात विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने हा विभाग स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग पूर्णपणे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येत आहे.सध्याच्या अपघात विभागात तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १५ बेड असून नवीन सुसज्ज विभागात ३० बेड, अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र प्रसूती कक्ष, डॉक्टर आणि नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असतील.फिजिओथेरपी जुन्या इमारतीतस्थलांतरित करण्यात येणाऱ्या इमारतीत सध्या फिजिओथेरपी विभागासह ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ या विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये सध्याच्या अपघात विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.सराफ संघाचे योगदानसध्याचा अपघात विभाग सुरू करण्यासाठी १९८५ मध्ये कोल्हापूर सराफ संघाने ‘सीपीआर’ला सुमारे एक लाख ८५ हजार रुपये निधी दिला होता, त्यातून तो विभाग सुरू करण्यात आला होता.

रुग्ण व नातेवाइकांची गर्दी आणि अपुऱ्या जागेमुळे रुग्णसेवा देताना अडचणी निर्माण होत होत्या. आता नवीन, प्रशस्त जागेत हा विभाग स्थलांतरित केल्यावर तेथे सुसज्ज रुग्णसेवा देता येतील.- डॉ. अजित लोकरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर