शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआर बोगस दरकरारपत्राद्वारे खरेदीच्या चौकशीचे आदेश, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:12 IST

‘लोकमत’ने हे बोगस दरकरार पत्राचे प्रकरण उघडकीस आणले 

कोल्हापूर: सीपीआरच्या सर्जिकल साहित्य खरेदीचा ठेका मिळवण्यासाठी मुलुंड येथील कामगार विमा रुग्णालयाचे बोगस दरकरार पत्र तयार करून त्याद्वारे ४ कोटी ८७ लाख रुपयांचा ठेका मिळविल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. चौकशीसाठी पुढच्या आठवड्यात मुंबईहून वरिष्ठ अधिकारी येण्याची शक्यताही असल्याचेही सांगण्यात आले.‘लोकमत’ने हे बोगस दरकरार पत्राचे प्रकरण उघडकीस आणले असून त्या सर्व प्रकरणामध्ये सीपीआरच्या प्रशासनाने बेफिकिरी दाखवत ठेकेदाराला सोयीची भूमिका कशी घेतली हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. याबाबत मुश्रीफ यांनी बातमी प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांना या प्रकरणाची माहिती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मुश्रीफ हे शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या प्रकरणाबाबत त्यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणामध्ये ‘न्यूटन’ प्रमाणेच कारवाई होणार का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे मी आदेश दिले आहेत. गरज पडली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून ही चौकशी केली जाईल. अधिष्ठाता यांनाही मी माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.‘न्यूटन’ च्या प्रकरणातही मी अन्न आणि औषध प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देऊन संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याही प्रकरणात चौकशीनंतर जे काही सत्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयHasan Mushrifहसन मुश्रीफ