सीपीआर रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:59+5:302021-07-10T04:17:59+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालय दोन महिन्यांहून अधिक काळ कोरोना रुग्णावरील उपचारासाठी राखीव असल्याने इतर आजारांवरील शस्त्रक्रिया बंदच आहेत. ...

सीपीआर रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंदच
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालय दोन महिन्यांहून अधिक काळ कोरोना रुग्णावरील उपचारासाठी राखीव असल्याने इतर आजारांवरील शस्त्रक्रिया बंदच आहेत. तेथे होणाऱ्या काही शस्त्रक्रिया सेवा रुग्णालयात केल्या जात आहेत. अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्याने सीपीआर इतर आजारावरील रुग्णासाठीच बंद राहणार आहे.
सीपीआर रुग्णालय कोरोना आजाराच्या रुग्णासाठी राखीव आहे. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत आहे. सीपीआरमधील बाह्यरूग्ण विभागातील आरोग्य सेवा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालयात दिल्या जात आहेत. पण येथे रुग्णांची संख्या अधिक आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
१) सीपीआर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे रुग्ण : ४५०
किती बेड्स रिकामे -२०
२) कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरू
सेवा रुग्णालयात
सेवा रूग्णालयात सिझेरियन, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसीनवर शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय हृदयविकार, किडणीसारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया करावे लागले तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला संबंधित रुग्णास दिला जातो.
सावित्रीबाई फुले रुग्णालयात
सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रसूतीसह इतर किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. यामुळे गरीब, सर्वसामान्यांची सोय झाली आहे. डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजाराची तपासणी, उपचार महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात केले जातात.
३) ६० दिवसांनंतरही ओपीडी बंदच
सीपीआर रुग्णालयातील ओपीडी ६० दिवसांनंतरही बंद आहे. कोरोना, म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांसाठी रुग्णालय राखीव असल्याने ओपीडी बंद आहे. परिणामी गरीब रुग्णांना उपचारासाठी इतर सरकारी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
४) गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे?
कोरोनाशिवाय इतर आजारांवर उपचार करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत गरीब रुग्णांना मोठी कसरत करावी लागत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचारावेळी खासगी रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे गरीब, सामान्य रुग्णांना वेळेत उपचार घेताना ओढाताणीला तोंड द्यावे लागले.
६) जिल्हा शल्यचिकित्सकांचा कोट
सीपीआर रुग्णालयातील ओपीडी आणि इतर आरोग्य सुविधा सेवा रुग्णालयात दिल्या जातात. गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.
-अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक
फोटो :०९०७२०२१-कोल -रूग्ण गर्दी
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात रुग्णांची अशी गर्दी असते.
फोटो : आदित्य वेल्हाळ