गायी चाेरीचा छडा, तीन चाेरटे ताब्यात, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:06+5:302021-06-30T04:17:06+5:30
या गुन्ह्यातील संशयित आराेपी संग्राम बळीराम कुंभार (वय २३), राेहित राजेंद्र कांबळे (वय २६, दाेघेही रा. कुरुकली), गणेश दगडू ...

गायी चाेरीचा छडा, तीन चाेरटे ताब्यात, एक फरार
या गुन्ह्यातील संशयित आराेपी संग्राम बळीराम कुंभार (वय २३), राेहित राजेंद्र कांबळे (वय २६, दाेघेही रा. कुरुकली), गणेश दगडू फराकटे (वय ३०) व महेश विष्णू तांबेकर (वय २५, दाेघेही रा. बाेरवडे) यांच्यावर मुरगूड पाेलिसांत गुन्हा नाेंद झाला आहे. यातील तिघांना ताब्यात घेतले असून राेहित कांबळे हा फरार झाला आहे.
याबाबत मुरगूड पाेलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तपासावेळी गाेपनीय बातमीदाराकडून माहिती कळताच चाेरट्यांच्या आज मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता गायी चाेरल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार संशयित आराेपी संग्राम कुंभार, राेहित कांबळे, गणेश फराकटे व महेश तांबेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाेरीसाठी वापरलेली बाेलेराे पिकअप व मोटरसायकल व चाेरीस गेलेल्या दाेन गायी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मुरगूड पाेलीस स्टेशनचे सपाेनि विकास बडवे यांनी दिली आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पाेलीस नाईक दीपक मोरे, स्वप्निल मोरे, राम पाडळकर, संदीप ढेकळे यांनी विशेष परिश्रम घेतले.