‘कोविशिल्ड’ आली, मात्र लसीकरण उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:30+5:302021-07-07T04:31:30+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाकडे कोविशिल्डचे सात हजार डोस आले असून उद्या, गुरुवारपासून त्याचे लसीकरण सुरू होत आहे. गेले ...

‘कोविशिल्ड’ आली, मात्र लसीकरण उद्यापासून
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाकडे कोविशिल्डचे सात हजार डोस आले असून उद्या, गुरुवारपासून त्याचे लसीकरण सुरू होत आहे. गेले दहा दिवस थांबलेल्या कोल्हापूर शहरातील लसीकरणास त्यामुळे गती मिळणार आहे.
गेल्या दहा दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा पुरवठाच झाला नव्हता. महानगरपालिका प्रशासनाची सर्व नागरी आरोग्य केंद्रांत त्यामुळे सामसूम होती. केवळ कोव्हॅक्सीन लसचे डोस दिले जात होते. परंतु त्याचे प्रमाणही अत्यल्प होते.
कोविशिल्ड लसीचे सात हजार डोस मंगळवारी प्राप्त झाले. गेले दहा दिवस लस नसल्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेल्या अनेकांना प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे केंद्रावर एकाच वेळी गर्दी होऊ नये, तसेच लसीकरणाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. ८४ दिवस पूर्ण झालेले २७ हजार नागरिक दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ज्यांचे जास्त दिवस झाले आहेत, त्यांचे प्राधान्यक्रम ठरवून लसीकरण केले जाणार आहे.