विद्यापीठातील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:30+5:302021-04-28T04:24:30+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने कोविड सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य पंकज मेहता, ...

A covid center should be set up for the teachers and staff of the university | विद्यापीठातील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर उभारावे

विद्यापीठातील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर उभारावे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने कोविड सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य पंकज मेहता, महेश निलजे आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने मंगळवारी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झाले. काहीजण उपचार घेत आहेत. त्यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील आणि विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना योग्य ते उपचार आणि सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने कोविड सेंटरची विद्यापीठामध्ये उभारणी करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Web Title: A covid center should be set up for the teachers and staff of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.