कोव्हॅक्सिन लस चाचणी आता ग्रामीण भागातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:23+5:302021-01-03T04:26:23+5:30

कोल्हापूर : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लस चाचणी आता ग्रामीण भागात करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ...

Covacin vaccine testing now also in rural areas | कोव्हॅक्सिन लस चाचणी आता ग्रामीण भागातही

कोव्हॅक्सिन लस चाचणी आता ग्रामीण भागातही

कोल्हापूर : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लस चाचणी आता ग्रामीण भागात करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित क्रोम हेल्थ ॲंड टुरिझम संस्थेकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये सुरू असलेल्या लस चाचणीसाठी ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली असून त्याबाबतचे काम सुरू आहे.

३१ डिसेंबर २०२० पर्यंत हे लस चाचणीचे काम संपवायचे होते. मात्र, अजूनही स्वयंसेवकांची गरज असताना तेवढ्या प्रमाणात नोंदणी झाली नाही. आता शहरातील स्वयंसेवकांची नोंदणी झाली असताना ग्रामीण भागातील आता या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी भादोले, पेठवडगाव, सांगरुळ या ठिकाणी स्वयंसेवकांची नोंदणी आणि चाचणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे परवानगी मागण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी सांगितले.

Web Title: Covacin vaccine testing now also in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.