भोगमवाडी येथे चुलत भावांचा तळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST2021-03-22T04:23:13+5:302021-03-22T04:23:13+5:30

अमित हा चौथीच्या वर्गात शिकत असून आदर्श हा त्याचा चुलतभाऊ पहिलीच्या वर्गात होता. दोघेही दुपारनंतर घरातून बाहेर गेले होते. ...

Cousins drown in pond at Bhogamwadi | भोगमवाडी येथे चुलत भावांचा तळ्यात बुडून मृत्यू

भोगमवाडी येथे चुलत भावांचा तळ्यात बुडून मृत्यू

अमित हा चौथीच्या वर्गात शिकत असून आदर्श हा त्याचा चुलतभाऊ पहिलीच्या वर्गात होता. दोघेही दुपारनंतर घरातून बाहेर गेले होते. सायंकाळी नातेवाईकांनी शोध घेतला असता शेजारील पाली या राधानगरी तालुक्यातील गावांतील इनाम नावाच्या शेतातील शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.

शेततळ्याच्या काठावर त्या दोघांच्या चपला व कपडे नातेवाईकांना आढळले. त्यामुळे नातेवाईकांनी तळ्यात शोध घेतला असता त्यांचे मृतदेह आढळून आले. अमितच्या मागे एक भाऊ व आई, वडील असा परिवार आहे. तर आदर्शच्या मागे दोन बहिणी व आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे भोगमवाडी व पाली या दोन गावांवर शोककळा पसरली होती. दोन्ही मुलांच्या आई,वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

Web Title: Cousins drown in pond at Bhogamwadi