पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींची नऊ फेऱ्यांत मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:56+5:302021-01-17T04:21:56+5:30

पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले असून, मयूर उद्यान येथील नगरपरिषद सांस्कृतिक हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. ...

Counting of votes in 39 rounds of 39 Gram Panchayats in Panhala | पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींची नऊ फेऱ्यांत मतमोजणी

पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींची नऊ फेऱ्यांत मतमोजणी

पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले असून, मयूर उद्यान येथील नगरपरिषद सांस्कृतिक हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता १८ टेबलांवर मतमोजणीला सुरुवात होणार असून, नऊ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली .

सोमवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी ५४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी कार्यरत राहतील. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आपटी, नेबापूर, देवाळे, नावली, जेऊर, इंजोळे या गावाची. दुसऱ्या फेरीत बुधवारपेठ, पैजारवाडी आवळी, धबधबेवाडी, जाफळे, पोखले, तिसऱ्या फेरीत मोहरे, आरळे, कसबा सातवे, हरपवडे, चौथ्या फेरीत तिरपण, कळे, पुनाळ, सातार्डे, पाचव्या फेरीत वाघवे / गुडे, पोर्ले तर्फ ठाणे, उंड्री. सहाव्या फेरीत सावर्डेतर्फ सातवे, केखले, नणुंद्रे, निवडे, पुशिरे तर्फ बोरगाव, निकमवाडी. सातव्या फेरीत तेलवे, म्हाळुगे तर्फ बोरगाव, पोंबरे, पोहाळे तर्फ बोरगाव, वारनूळ, कणेरी, तर आठव्या फेरीत दिगवडे , पोहाळवाडी, माजनाळ, कोडोली गावांची मतमोजणी होणार आहे. नव्या फेरीत कोडोली ग्रामपंचायतीच्या उर्वरित प्रभागांची मोजणी होणार आहे.

Web Title: Counting of votes in 39 rounds of 39 Gram Panchayats in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.