हातकणंगलेत २० गावाची सहा फेऱ्यात मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:02+5:302021-01-17T04:22:02+5:30
हातकणंगले तालुक्यातील २१ पैकी २० ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने ८२ .५१ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वांचेच लक्ष सोमवारी होणाऱ्या ...

हातकणंगलेत २० गावाची सहा फेऱ्यात मतमोजणी
हातकणंगले तालुक्यातील २१ पैकी २० ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने ८२ .५१ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वांचेच लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. सोमवारी सकाळी येथील नवीन प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर ३० टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक शिपाई. तर संगणक ४ टेबलवर प्रत्येकी दोन. याप्रमाणे कर्मचारी मतमोजणी करणार आहेत.
पहिल्या फेरीमध्ये हॉल क्रमांक १ मध्ये टेबल क्रमांक १ ते १५ टेबलवर पाडळी, मनपाडळे, वाठार तर्फे उदगाव, हालोंडी तर दुसऱ्या मजल्यावरील टेबल क्र. १६ ते ३० वर वाठार तर्फे वडगाव, मिणचे या गावची मतमोजणी होणार आहे.
दुसरी फेरी हॉल क्र १ मध्ये टेबल क्र १ ते १५ वर किणी, बिरदेववाडी, तिळवणी तर दुसरा मजला १६ ते ३० टेबलवर लाटवडे, नेज, माणगावाडी. तिसरी फेरी हॉल क्र १ टेबल १ ते १५ रुई आणि दुर्गेवाडी तर दुसरा मजला टेबल क्र १६ ते ३० वर खोची आणि जंगमवाडी. चौथी फेरी हॉल क्रं १ टेबल १ ते १५ चंदूर तर दुसरा मजला टेबल क्र १ ते १६ वर माणगाव. पाचवी आणि सहाव्या फेरीमध्ये हॉल क्र-१ टेबल क्र. १ ते १५ वर कबनूर तर दुसरा मजला टेबल क्र. १६ ते ३० टेबलवर कुंभोज गावची मतमोजणी होणार आहे.