हातकणंगलेतील गाव तलावाची मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:07+5:302021-09-17T04:29:07+5:30
हातकणंगले शहराच्या मध्यभागी असलेल्या गाव तलावामध्ये (खण) साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी शेतात ...

हातकणंगलेतील गाव तलावाची मोजणी
हातकणंगले शहराच्या मध्यभागी असलेल्या गाव तलावामध्ये (खण) साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी शेतात शिरल्याने परिसरातील शेतीचे नुकसान होत होते. या खणीचे सुशोभीकरण करून नागरिकांचे आरोग्य बिघडू नये तसेच शेतीचे नुकसान टाळावे यासाठी नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी तीन दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी खणीची तात्काळ मोजणी करून त्यातील साचलेले पाणी, गाळ तात्काळ काढून प्रश्न कायमचा काढण्याबाबतचा लेखी ठराव नगरपंचायतीने उपोषणकर्त्यांना दिला होता. त्यानुसार नगरपंचायतीने तातडीने एका महिन्यामध्ये तात्काळ शासकीय मोजणीची मागणी करून गाव तलाव खाणीची शासकीय मोजणी पूर्ण केली. यामुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लागून तलाव सुशोभीकरणास गती येणार आहे.
कोट.
नियमांनुसार शासकीय मोजणीची प्रक्रिया पूर्ण होणारच. त्यात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
स्नेहलता कुंभार, प्र. मुख्याधिकारी, नगरपंचायत, हातकणंगले.
कोट.
नागरिकांच्या मागणीनुसार खणीच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. हद्द निश्चित झाल्यानंतर कंपाउंड करून घेऊन सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाईल.
अरुणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष, हातकणंगले
फोटो..
१ ) गाव तलाव मोजणी करताना शासकीय कर्मचारी प्र.मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, भाजप पक्ष प्रतोद राजू इंगवले, आरोग्य सभापती विजय खोत व इतर नगरसेवक उपस्थित होते.