थकीत घरफाळाप्रश्नी ‘बड्यां’ना जप्तीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 01:43 IST2015-12-20T01:37:02+5:302015-12-20T01:43:08+5:30

महापालिकेची कारवाई : जनता बझार, व्हिक्टर पॅलेस, कॉमर्स कॉलेजचा समावेश

Counterfeit Notices for 'Badya' | थकीत घरफाळाप्रश्नी ‘बड्यां’ना जप्तीच्या नोटिसा

थकीत घरफाळाप्रश्नी ‘बड्यां’ना जप्तीच्या नोटिसा

कोल्हापूर : शहरातील दहा लाखांपेक्षा जादा थकीत घरफाळा असणाऱ्या ‘बड्या’ व्यावसायिकांना महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने धडाधड जप्तीच्या नोटिसा पाठविल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रत्येकांना प्रत्येकी ७ ते १५ दिवसांत थकीत घरफाळा रक्कम भरा अन्यथा जप्तीच्या कारवाईस सामोरे जावा, असाही इशारा देण्यात आला आहे.
शहरात घरफाळा विभागाच्यावतीने थकीत घरफाळाप्रश्नी ‘बड्या’ व्यावसायिकांना नोटिसा बजावल्याने व्यावसायिकांत खळबळ माजली आहे. या प्रत्येकाची घरफाळ्याची थकीत रक्कमही ७ लाखांपासून सुमारे १७ लाखांपर्यंत आहे. या सर्वांना ७ ते १५ दिवसांत थकीत घरफाळा रक्कम भरावी अन्यथा जप्तीच्या अथवा बोजा चढविण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Counterfeit Notices for 'Badya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.