शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

काऊंटडाऊन सुरुच , २७५८ रुग्ण कोरोना मुक्त होण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:46 IST

 कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा काऊंटडाऊन वेगाने सुरु असून शुक्रवारी ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले २७५८ रुग्ण कोरोनामुक्त होण्याची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत नवीन ८४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकाऊंटडाऊन सुरुच , २७५८ रुग्ण कोरोमुक्त होण्याच्या प्रतिक्षेत जिल्ह्यात नवीन ८४ रुग्णांची तर सहा मृत्यूची नोंद

 कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा काऊंटडाऊन वेगाने सुरु असून शुक्रवारी ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले २७५८ रुग्ण कोरोनामुक्त होण्याची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत नवीन ८४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.कोल्हापूर जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेबर अशा तीन महिन्यात अक्षरश: धुमाकुळ घातलेल्या कोरोनाचा आक्टोबर महिन्यात काऊंटडाऊन सुरु होईल यावर विश्वास बसत नव्हता. परंतू योग्य तसेच तातडीने उपचार, कोरोना चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण अशा विविध उपाययोजनामुळे ही साथ आटोक्यात आली. गेल्या काही दिवसापासून तर अनेक तालुक्यात केवळ एक दोन रुग्ण आढळून येत असून अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.शुक्रवारी पुन्हा एक दिलासा मिळाला. जिल्ह्यात केवळ ८४ रुग्ण आढळून आले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यामध्ये शिरोळमधील अब्दुललाट, हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी, गडहिंग्लजमधील लिंगनूर, करवीरमधील उजळाईवाडी, सोलापूरमधील सांगोला तर कोल्हापूर शहरातील रामानंदनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४१ टक्के इतका झाले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. ज्या गतीने कोरोना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरला त्याच गतीने तो कमीही होत आहे. परंतू कोरोनाची भिती अजूनही जनतेच्या मनात असल्याने तोंडाला मास्क, सोशल डिस्टंन्सींगचे नियम पाळले जात आहेत.-गेल्या चोवीस तासातील चाचण्या-प्रकार                  निगेटिव्ह  पॉझििटव्ह

  • आरटीपीसीआर        ४७४           २९
  • ॲन्टीजेन                  १३३          १०
  • खासगी लॅब              १६६          ४५ 

तालुका निहाय रुग्ण संख्या -आजरा - ८२६, भुदरगड - ११८३, चंदगड - ११३८, गगनबावडा - १३३, हातकणंगले - ५१२८, कागल - १६१०, करवीर - ५६६०, पन्हाळा - १८०८, राधानगरी - १२०१, शाहूवाडी - १२६०, शिरोळ - २४१३, नगरपालिकाहद्द - ७२५६, कोल्हापूर शहर - १४,२९६, इतर जिल्हा - २१४९.

  • एकूण रुग्ण संख्या - ४७ हजार २११
  • कोरोनामुक्त रुग्ण - ४२ हजार ८६५
  • एकूण मयत रुग्ण - १५८८
  • उपचार घेत असलेले रुग्ण - २७५८
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर