देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:25+5:302021-09-14T04:29:25+5:30

कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वी बरखास्त झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल ...

Corruption in temples should be investigated | देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वी बरखास्त झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी अंबाबाई भक्त समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात देवस्थान समितीने अधिकार नसताना सामाजिक निधीच्या नावाखाली भरमसाठ रक्कम वेगवेगळ्या संस्थांना दिली, मंदिराबाहेरील रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटी दिले. भाड्याने घेतलेल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले. पॅथॅलॉजी लॅबचा घाट घालून लाखो रुपये वाया घालविले. लॉकर-चप्पल स्टँड, तसेच जोतिबा डोंगर येथे झाडे न लावता या सर्वांचा ठेका एकाच माणसाला देण्यात आला. भक्त निवासाच्या बांधकामाचे टेंडर कमी रकमेच्या माणसाला न देता मर्जीतल्या माणसाला चढ्या दराने देण्यात आो. महसूल खात्याकडे जमिनींचे सगळे रेकॉर्ड असताना खासगी कंपनीला सर्व्हेसाठी ७ कोटी रुपये देण्यात आले. मंदिर रोषणाई, सुशोभीकरण, विद्युतीकरणावर ३ कोटी खर्च करण्यात आले. शासनाने पुरविलेली मोफत पोलीस प्रशासनाची सुविधा बंद करून अनधिकृत व कुचकामी सुरक्षारक्षकांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. आणखी काही काळ ही समिती राहिली असती तर खजिनाच रिकामा केला असता. तरी या सगळ्या प्रकरणांचा मुळापासून तपास केला जावा व या गैरकारभारातील दोषींची चौकशी करावी व तीन वर्षे प्रशासक समिती नेमण्याची शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रमोद सावंत, किशोर घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

------

Web Title: Corruption in temples should be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.