राजीनाम्यावर नगरसेवक ठाम

By Admin | Updated: November 27, 2014 00:51 IST2014-11-27T00:28:01+5:302014-11-27T00:51:05+5:30

रस्ते कामांसाठी पवित्रा : आज महापालिका आयुक्तांशी बैठक

Corporators are strong about resignation | राजीनाम्यावर नगरसेवक ठाम

राजीनाम्यावर नगरसेवक ठाम

कोल्हापूर : जुना वाशीनाका ते रंकाळा टॉवर या रस्त्याचे गेली साडेचार वर्षे रखडलेले काम पूर्ण करा; अन्यथा राजीनामा देऊ, या मागणीवर माजी महापौर सुनीता राऊत, अरुणा टिपुगडे, परीक्षित पन्हाळकर, आदी शिवाजी पेठ परिसरातील नगरसेवक ठाम आहेत.
या प्रकरणी उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजता महापौर तृप्ती माळवी यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. तोडगा न निघाल्यास राजीनामा अटळ असल्याचे माजी महापौर सुनीता राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रंक ाळा ते जुना वाशी नाका या रस्त्याचे काम गेली साडेचार वर्षे रखडले आहे. यावरून वाद सुरू आहे. करारानुसार हा रस्ता ‘आयआरबी’ने करावयाचा असला तरी कंपनीने हा रस्ता करण्यास असमर्थता दर्शविली आहे. शुक्रवारी (दि. २८) महापालिकेच्या महासभेपूर्वी रस्त्याचे काम सुरू न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा चार दिवसांपूर्वी नगरसेवकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी नगरसेवकांना दिले आहे.
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील करारानुसार प्रलंबित व अपूर्ण कामे पूर्ण करा, ही महापालिकेची मागणी ‘आयआरबी’ने फेटाळलीे. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका हा रस्ता ड्रेनेज लाईनमुळे गेली साडेचार वर्षे बंद होता. आता तो वाहतुकीसाठी खुला झाला. धुळीमुळे पसिररातील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
रस्ता कोणी करावयाचा या वादात न पडता शुक्रवार (दि. २८)पर्यंत रस्ताबांधणीचे काम सुरू न झाल्यास शिवाजी पेठ परिसरातील नगरसेवक सामूहिक राजीनामा देतील, असा पुन्हा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)


रंकाळा-जुना वाशी नाकादरम्यान ड्रेनेज पाईपलाईनचे काम गेली साडेपाच वर्षे सुरू होते. आता काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता क ोणी करायचा हा नवा वाद उद्भवला आहे. त्यामुळे भविष्यातही शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याभोवतीचा रस्ता ‘जैसे थे’च राहण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीत रस्त्याबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यास राजीनाम्यावर ठाम आहे.
- सुनीता राऊत (माजी महापौर)

Web Title: Corporators are strong about resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.