शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

CoronaVirus Lockdown : सीपीआर प्रशासनावर ताण, तपासणीसाठी दिवसभर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:44 IST

कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्याने तपासणीसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भलताच ताण पडत आहे.

ठळक मुद्देसीपीआर प्रशासनावर ताण, तपासणीसाठी दिवसभर रांगा  क्वारंटाईन करण्यावरून कर्मचारी, नागरिक वादावादी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्याने तपासणीसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भलताच ताण पडत आहे.

तपासणीनंतर त्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक आहे, तरीही अनेकजण होम क्वारंटाईनसाठी आरोग्य यंत्रणेकडे आग्रह धरत असल्याने प्रशासनासोबत त्यांचे वादावादीचे अनेक प्रसंग घडत आहेत.मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे प्रचंड प्रमाणात कोल्हापुरात येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाही तितक्याच प्रमाणात झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणेसह रेडझोनमधील नागरिकांना कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे जाहीर केले, तरीही नागरिकांचे लोंढे थांबेनात, त्यामुळे त्यांचे नाक्यावर तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा सीपीआर रुग्णालयात तपासणीसाठी आणले जात आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे.

रेडझोनमधून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या घशातील स्राव तपासणी बंधनकारक असल्याने त्यांची तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. सहकुटुंब कोल्हापुरात प्रवेश करत असल्याने त्यामध्ये महिलांसह लहान बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.याशिवाय ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधून आलेल्यांसाठी सीपीआरमध्येच स्वतंत्र कक्ष उभारले आहेत, त्याठिकाणी फक्त स्क्रीनिंग केले जाते. याशिवाय परजिल्ह्यांत जाण्यासाठी वैद्यकीय सक्षम प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते मिळवण्यासाठीही नागरिक रांगेत थांबून आपली तपासणी करून घेत आहेत.दिवसभर या तपासणीसाठी रांगा असल्याने परजिल्ह्यांतून आलेले नागरिक सहकुटुंब सीपीआर आवारातच आपली आणलेली शिदोरी सोडून भूक भागवत आहेत. पण या वाढत्या गर्दीमुळे आरोग्ययंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे.

अनेकजण घरी लहान मुले आहेत, असे कारण सांगून तपासणी केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाईन करण्याऐवजी होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करत आहेत. त्यावरून अनेकांचे वादावादीचेही प्रकार घडत आहेत.दिल्लीहून आले २० विद्यार्थीलॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खास रेल्वेने आणले, त्यामध्ये कोल्हापुरातील ६० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी २० विद्यार्थ्यांची  सीपीआर रुग्णालयात तपासणी करून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले.व्हीटीएम किटचा पुरवठासीपीआर रुग्णालयात रुग्णाच्या घशातील स्राव तपासणी करण्यासाठी व्हीटीएम किटचा तुटवडा भासला होता. पण सकाळी या किटचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाला. त्यामुळे रुग्णांची तपासणी करण्यासाठी व्हीटीएम किटचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध झाल्याचे रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय