शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

CoronaVirus Lockdown : आई-वडील आजारी, नातेवाईक वारले, प्रवासासाठी अनेकांची बनवेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:30 IST

प्रवास करायचा तर आहेच, पण ‘लॉकडाऊन’ असल्याने अनंत अडचणींचा डोंगर समोर आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांची आॅनलाईन परवानगी हेच एकमेव हत्यार. पण ही परवानगी मिळवायची असेल तर तसे पटण्यासारखे कारणही देणे बंधनकारक. जिल्ह्यातील सुमारे १२०० हून अधिक जणांनी पोलिसांच्या आॅनलाईन परवानगी अ‍ॅपचा आधार घेतला. त्यात बनवाबनवीची कारणेही पुढे केल्याने पोलीसही संभ्रमात सापडले.

ठळक मुद्देआई-वडील आजारी, नातेवाईक वारलेप्रवासासाठी अनेकांची बनवेगिरी : पोलीस अ‍ॅपवर १२०० हून अधिक अर्ज

कोल्हापूर : प्रवास करायचा तर आहेच, पण ‘लॉकडाऊन’ असल्याने अनंत अडचणींचा डोंगर समोर आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांची आॅनलाईन परवानगी हेच एकमेव हत्यार. पण ही परवानगी मिळवायची असेल तर तसे पटण्यासारखे कारणही देणे बंधनकारक. जिल्ह्यातील सुमारे १२०० हून अधिक जणांनी पोलिसांच्या आॅनलाईन परवानगी अ‍ॅपचा आधार घेतला. त्यात बनवाबनवीची कारणेही पुढे केल्याने पोलीसही संभ्रमात सापडले.

आई-वडील आजारी आहेत, मुलाची तब्येत बिघडलीय, पत्नीची प्रकृती बिघडलीय, यासह जवळच्या नातेवाईकाला देवाघरीही पाठवल्याचे कारण पुढे करण्याची शक्कल लढवत पोलिसांना परवानगी देणे भागच पडले आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रथम जनता कर्फ्यू अन् त्यानंतर जमावबंदी, संचारबंदी व अचानक लॉकडाऊन झाल्याने अनेकांची कुचंबणा झाली. त्यात अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करावयाचा असल्यास पोलिसांची परवानगी बंधनकारक झाले. पण अशा काळात पोलीस हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या मदतीला धाऊन आले. पोलिसांनी त्या-त्या जिल्ह्यात आॅनलाईन परवानगी प्रणाली विकसित केली. लिंकही शेअर केली.तातडीच्या, अत्यावश्यक कामांसाठी गरजवंतांनी या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलांच्या अ‍ॅपवर भराभर अर्ज केले, अन् प्रवासाचा मार्ग सुकर झाला. अनेकांना गावाकडे जायचे होते. कोल्हापूर जिल्ह्यातून ‘त्या’ लिंकवर सुमारे १२०० हून अधिक जणांनी अर्ज केले. बहुतांशी जणांना मुंबई-पुण्याहून शहरात यायचे होते. कारणेही तशीच शोधली.

कुणी आई आजारी आहे, भावाचा मृत्यू झालाय, गावाकडे मुलांची तब्येत बिघडलीय, शेतीच्या वाटणीवरून गावी वादावादी सुरू आहे अशी कारणे पुढे केली. काहींनी चक्क जवळच्या जिवंत असणाऱ्या अगर यापूर्वीच मृत व्यक्तींचे देहावसान झाल्याचे कारणही दाखविण्यास मागे-पुढे पाहिले नाही. पोलिसांच्या पोर्टलवर बनवाबनवीची कारणे देऊन अर्ज केल्यानंतर त्यांचे उत्तरही अवघ्या २४ तासांत पडताळणी होऊन मिळत असल्याने ही मंडळी ऐटीतच प्रवास करायला रिकामी होतात.पोलिसांवर ताणलॉकडाऊन काळात पोलीस हे घरदार सोडून रस्त्यावर राहिले. अतिरिक्त कामाचा ताण पोलिसांच्यावर वाढत आहे. इतरांचे संरक्षण करताना पोलीसही वैतागले. नागरिकांनीही पोलिसांशी संयमाने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.१८० प्रवास परवाने नाकारलेलॉकडाऊन काळात कोल्हापूर पोलिसांच्या अ‍ॅपवर सुमारे १२०० हून अधिकजणांनी प्रवास करण्यासाठी विविध कारणे दाखवत परवानगी मागितली होती. सुमारे १८० जणांची बनवाबनवीची कारणे पडताळणीत निदर्शनास आल्याने संबंधितांना परवानगी नाकारल्याचे समजते.बनावट कारणे

  • वडिलांचे देहावसान झाले
  • गावाकडे घरी मारामारी झाली
  • आईची तब्येत बिघडलीय
  • वडील रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत
  •  पुतण्याचे निधन झाले

बनवेगिरी उघडआॅनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर पडताळणी करताना पोलीस प्रशासनाने काही गावात ओळखीच्या ठिकाणी फोन करून खात्री केल्यानंतर अनेकांची बनवेगिरीची कारणे उघड झाली. अशा परवानगी नाकारल्या आहेत. बनवेगिरीची कारणे दाखविणाऱ्यांवर गुन्हे नोंदवणे अपेक्षित आहे, पण त्यामुळे पोलिसांच्या ताण-तणावात अतिरिक्त भर पडेल म्हणून त्यांना फक्त परवानगी नाकारून पिच्छा सोडविला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर