शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus Lockdown : 'गडहिंग्लज'मध्ये शेतकऱ्याच्या मित्राला जीवदान, शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:15 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आजारी माणसाला वेळेत उपचार मिळणे मुश्किल झाले आहे.परंतु,याच कठिण काळात येथील प्राणीमित्रांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून आजारी धामण सापाला जीवदान दिले आहे.

ठळक मुद्दे'गडहिंग्लज'मध्ये शेतकऱ्याच्या मित्राला जीवदान, शस्त्रक्रिया यशस्वीजखमी धामण सापाला वाचवण्यात प्राणीमित्रांना यश

राम मगदूम

गडहिंग्लज ( जि.कोल्हापूर )  :  कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आजारी माणसाला वेळेत उपचार मिळणे मुश्किल झाले आहे.परंतु,याच कठिण काळात येथील प्राणीमित्रांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून आजारी धामण सापाला जीवदान दिले आहे.गडहिंग्लज येथील वडरगे रोडवरील केडीसी कॉलनीमधील एका निवासी संकुलातील रहिवाशी संतोष बेगडा यांना तळमजल्यात साप आढळून आला.त्यामुळे त्यांनी प्राणीमित्र हेमंत तोडकर यांना तात्काळ बोलावून घेतले. तोडकर यांनी कौशल्याने त्या सापाची अडचणींमधूनसुटका केली. त्यावेळी तो जखमी व आजारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.यासंदर्भात त्यांनी वन विभागालाही माहिती दिली.वनविभागाच्या परवानगीने येथील पशुवैद्यकीय डॉक्टर वरूण धुप यांच्या दवाखान्यात नेले. त्याठिकाणी सापाची चिकित्सा केली असता त्याच्या डाव्या बाजूच्या जबड्याला जखम आणि गुदद्वाराजवळ पोटाकडील बाजूस सूज आल्याचे दिसून आले.

दरम्यान,इस्लामपूर येथील महाराष्ट्र अ‍ॅनिमल रिट्रायविंग असोसिएशनचे सचिव विशाल पाटील यांच्याशी त्यांनी सल्ला मसलत केली. त्यांच्या सल्ल्यानुसार सूज आलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून सापाच्या पोटातील कृमी बाहेर काढण्यात आले.त्यामुळे त्याची प्रकृतीत सुधारणा होत आहे.या संस्थेने अनेक जखमी पक्षी व प्राण्यांना त्यांच्या निसर्गातीलअधिवासात सुरक्षितपणे सोडले आहे. जखम बरी झाल्यावर या सापालादेखील निसर्गाच्या अधिवासात सोडणार आहे, असे तोडकर यांनी सांगितले. याकामी त्यांना निखिल पाटील, सुशील असोदे यांनी सहकार्य केले.शेतकऱ्याचा मित्र... !धामण जातीचे साप सर्वत्र आढळतात.त्यांचा रंग तपकिरी, काळपट,पिवळट, राखाडी, मातकट व तांबूस असतो. डोळे मोठे असणारा हा साप अतिशय चपळ आहे. बेडूक व उंदीर हे त्याचे प्रमुख अन्न आहे. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा तो फडशा पाडतो.त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMedicalवैद्यकीय