शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 08:08 IST

कोरोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहेत.

कोल्हापूर - एकीकडे देश आणि राज्यावर ओढवलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कोल्हापुरात कोरोनाचा संशय असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले आहे.कोरोनाचा संशय असलेला हा रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून पसार झाला आहे. हा 28 वर्षिय कोरोनाचा संशयित रुग्ण दुबईहून भारतात परतला होता. दरम्यान, तो आपली कागदपत्रे घेऊन रुग्णालयात आला. मात्र जरा बाहेर जाऊन येतो, असे सांगून तो रुग्णालयतून पसार झाला.दरम्यान, असाच प्रकार नागपूरमधून समोर आला आहे.  नागपुरात होम कोरेंटाईन केलेली संशयित कोरोना बाधित महिला उत्तर प्रदेशात पळून गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार, 35 वर्षीय ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिचे माहेर उत्तर प्रदेश मध्ये आहे.  ती 15 मार्चला शारजाह येथून नागपुरात परत आली होती. तिला होम  कोरेनटाईन करण्यात आले होते. घराबाहेर पडायचे नाही, कुणाच्या संपर्कात यायचे नाही, अशी स्पष्ट ताकीद वजा सूचना या महिलेला देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,सगळ्यांना चुकवुन ही महिला घरून निघून गेल्याचे सोमवारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस प्रशासन -जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. नातेवाईकांकडे विचारणा केली असता ही महिला उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात या महिलेचे माहेर असल्याचीही माहिती पुढे आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या