शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच गोंधळ, शाळेत आलेले शिक्षक परत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:26 IST

शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले.

ठळक मुद्देशैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच गोंधळ, शाळेत आलेले शिक्षक परत गेले पुढील आदेशापर्यंत शाळा बंद राहणार

कोल्हापूर : शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले.

प्राथमिक आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांना मात्र, त्याबाबतच्या आदेशाची दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे प्राथमिक, माध्यामिक शाळांतील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात एकप्रकार गोंधळाने झाली. शहरातील काही शाळांनी नववी, दहावीच्या ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात केली.शाळा सुरू करण्यासाठी शासन आणि शिक्षण विभागाची वेगवेगळी भूमिका राहिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत. शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश रविवारी रात्री दिले. पण, त्याबाबतचा शिक्षण विभागाकडून लेखी आदेश प्राप्त झाला नसल्याने शिक्षक सोमवारी सकाळी वेळेत शाळेत आले.

त्यावर मुख्याध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लोहार यांनी शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्देश प्राप्त होताच कळविण्यात येईल, या सूचनेचे परिपत्रक सोशल मिडियाव्दारे प्राचार्य, मुख्याध्यापकांना पाठविले.

या परिपत्रकाची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिली. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण, नवीन वर्षाचे वेळापत्रक निश्चिती, आदींबाबत चर्चा करून माध्यमिक शिक्षक घरी परतले. त्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व कोल्हापूर शहर प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेवून शासन आदेशाबाबत विचारणा केली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून पुढील आदेश दिले जातील, असे सांगितले. त्यानंतर दुपारी पावणेचार वाजता आदेश मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षकही घरी परतले.

शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, महापालिका शाळा आणि खासगी प्राथमिक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात केली. मुख्याध्यापक, क्लार्क आणि काही शिक्षक प्रवेश प्रक्रिया, पुस्तक वितरणासाठी शाळेत थांबून होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूरSchoolशाळा