कोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:42+5:302021-07-22T04:16:42+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाचा विळखा सैल होऊ लागला असून सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या कमी झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ...

Coronation release rate at 90% | कोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर

कोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाचा विळखा सैल होऊ लागला असून सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या कमी झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या २०४ ने वाढलेली दिसत असली तरी देखील कोरोनामुक्तांचा आकडा बाधितांपेक्षा ४० ने जास्त आहे; शिवाय एकूणच जिल्ह्याचे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणे ९०.३१ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात बुधवारी १०६१ नवे कोरोनाग्रस्त आढळले; तर २१ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक सात मृत्यू हे कोल्हापूर शहरात झाले आहेत, तर पन्हाळ्यात चार मृत्यू झाले आहेत. गडहिंग्लजमध्ये ३, हातकणंगलेत २ मृत्यू आहेत. करवीर, शिरोळ, राधानगरीत प्रत्येकी एक मृत्यू आहे. विशेष म्हणजे आजरा, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा येथे एकही मृत्यू नाही. गगनबावड्यात तर एकही रुग्ण नाही की एकही मृत्यू नाही.

कोल्हापूर शहरात नव्याने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक घटतच चालले आहे. मंगळवारी १९० वर असणारा आकडा बुधवारी १५९ वर आला. दोन दिवसांपूर्वी पाचशेच्या वर रुग्ण आढळलेल्या करवीरचीही संख्या १५९ पर्यंत खाली आहे. हातकणंगलेची संख्या ५० ने वाढली आहे. कागलची संख्यही ४१ वरून एकदम १३२ वर पाेहोचले आहे. सुदैवाने कागलमध्ये बुधवारी एकही मृत्यू नाही.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत १८ हजार ७४१ जणांची कोरोना टेस्ट झाली आहे. त्यात आढळलेल्या १०६१ बाधितांपैकी ६९८ अहवाल हे खासगी प्रयोगशाळेतील आहेत. अजूनही सरकारीपेक्षा खासगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्तच दिसत आहे.

आज झालेले मृत्यू

कोल्हापूर शहर : ०७ रंकाळा, भोसलेवाडी, मार्केट यार्ड, शाहू कॉलनी, शुक्रवार पेठ, जरगनगर, कदमवाडी

गडहिंग्लज : ०३ ब्रह्मदेवी मंदिर, गडहिंग्लज, बड्याचीवाडी, भादवणवाडी

पन्हाळा : ०४ कळे, कोडाेली, कोतोली, पोहाळे

करवीर: ०१ वडणगे

शिरोळ : ०१ राजापूर

हातकणंगले : ०२ कबनूर, इचलकरंजी

राधानगरी : ०१ राधानगरी

इतर जिल्हा : ०१ इस्लामपूर (वाळवा)

Web Title: Coronation release rate at 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.