माजी सैनिकाकडून कोरोनाग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:17+5:302021-05-17T04:23:17+5:30
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिक व माजी उपसरपंच पंडित बाबूराव लोकरे यांनी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

माजी सैनिकाकडून कोरोनाग्रस्तांना मदत
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिक व माजी उपसरपंच पंडित बाबूराव लोकरे यांनी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणारे कर्मचारी व गावातील कोरोनाग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक भेटवस्तू देऊन सन्मान केला.
पंडित लोकरे यांनी चुलते विलासराव व वडील बाबूराव लोकरे यांच्या स्मरणार्थ कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या पाच आशा वर्कर व ३९ कोरोनाग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी सहा जीवनावश्यक वस्तू दिल्या. गावातील हेळव्याचा हरवलेला मुलगा दर्शन याला स्वखर्चाने कर्नाटकातून शोधून आणणारा वाहनचालक उत्तम वाघमोडे याचा सत्कार केला.
यावेळी पंडित लोकरे, रामभाऊ लोकरे, विनोद लोकरे, माजी सैनिक जयवंत डोंगरे, महादेव कुंभार, शिवाजी डोंगरे, बाळासाहेब माने, दावल मुल्ला, सुदाम पाटील, जालंदर पाटील, बी. टी. पाटील, मनपाडळेचे अरुण पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी: अंबप (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिक पंडित लोकरे यांच्याकडून कोरोना कर्मचारी यांचा वस्तू देऊन सन्मान राजश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंडित लोकरे, अरुण पाटील, बी. टी. पाटील, आदी उपस्थित होते.
१६ अंबप कोरोना मदत