वडगावात कोरोनाचा कहर; रुग्णसंख्या ५१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:13+5:302021-06-16T04:34:13+5:30

दरम्यान, पालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री कारवाई सुरू आहे. त्यामुळे वडगावातील रुग्णसंख्या आटोक्यात कोण आणणार? असा प्रश्न उपस्थित ...

Corona's havoc in Wadgaon; Number of patients 518 | वडगावात कोरोनाचा कहर; रुग्णसंख्या ५१८

वडगावात कोरोनाचा कहर; रुग्णसंख्या ५१८

दरम्यान, पालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री कारवाई सुरू आहे. त्यामुळे वडगावातील रुग्णसंख्या आटोक्यात कोण आणणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अत्यावश्यकसह अन्य व्यवसाय चोरी छुपके सुरू असून त्याने नागरिकांच्या जीव टांगणीला लागला आहे.

सोमवारी बाजारपेठेत गर्दी होत आहे. त्यातून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतोय. ठोस उपाययोजनेअभावी दिवसभर गर्दीचा उच्चांक असतो.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या ५१८ झाली आहे. माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्ष विद्या पोळ आदींसह घरातील सर्वजण कोरोनाबाधित झाले आहेत तर रक्त , स्वॅब घेणारे मेडिकल व्यावसायिक कोरोनाबाधित झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

फोटो कॅप्शन पेठवडगाव: येथे वाणी पेठेत नागरिकाची सोमवारी झालेली गर्दी (छाया : संतोष माळवदे)

Web Title: Corona's havoc in Wadgaon; Number of patients 518