धामोडमध्ये कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:11+5:302021-07-14T04:28:11+5:30
* ठोस उपाययोजनांची; लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : राधानगरी ...

धामोडमध्ये कोरोनाचा कहर
* ठोस उपाययोजनांची;
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : राधानगरी तालुक्याचा कोरोना आलेख इतर तालुक्यांच्या तुलनेत आजआखेर कमी होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील धामोड, म्हासुर्ली, राशिवडे बुद्रूक, टिटवे, राधानगरी, तुरंबे, सरवडे, कसबा वाळवे या मोठ्या गावांमध्ये धोरणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडावयास सुरुवात झाली आहे. तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या धामोड गावामध्ये दोन दिवसांत जवळपास पन्नास रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धामोड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
धामोड गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने धामोड गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून गाव १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक स्तरावर आरोग्य, दूध संकलन व शेती संबंधीची कामे वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम गावामध्ये फिरून आरटीपीसीआर चाचणी करण्यासंदर्भात लोकांना आवाहन करत आहेत.
येत्या दोन दिवसांत हा आकडा कमी न आल्यास गावातील फक्त आरोग्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याचबरोबर गावातील सर्व सीमा बंद करणे, आरटीपीसीआर चाचणीवर भर देणे आणि लसीकरण करण्यावर जोर देणे, गावात औषधफवारणी व गावाचे निर्जंतुकीकरण करणे या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.