करवीरमध्ये कोरोनाचा डेथ रेट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:03+5:302021-06-21T04:18:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ व कोरानाबाधितांचा मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य ...

Corona's death rate in Karveer is dangerous | करवीरमध्ये कोरोनाचा डेथ रेट धोकादायक

करवीरमध्ये कोरोनाचा डेथ रेट धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ व कोरानाबाधितांचा मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभागाला अपयश येत आहे. करवीरमध्ये कोरोनाबाधितांची व मृत्यूची ‘लाट’ निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झालेली संख्या करवीर तालुक्यात आहे. आज (रविवारी) करवीरमध्ये एका दिवसात १७५ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर आठ कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. करवीरमधील कोरोनाबाधितांचा डेथ रेट धक्कादायक आहे.

करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात एप्रिलमध्ये झाली. मात्र कोरोनाबाधित व यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. करवीरमधील अनेक गावे हॉटस्पॉट होऊ लागली. पण कडक लॉकडाऊनला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या समूह संसर्गाचा मोठा फैलाव झाला आहे.

पहिल्या टप्यात शहरालगतची गावे हॉटस्पॉट झाली पण मेच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ लागला. तालुक्यात प्रथम दिवसाला १०० ते १५० कोरोना बाधितांचा येणारा आकडा आता ३०० ते ३५० वर पोहोचला. दरोजचा बाधितांचा व मृतांची आकडेवारी पाहता कडक लॉकडाऊन नंतरही करवीरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तर लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढणार आहे.

करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेत एप्रिलपासून १३ हजार २०१ लोकांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली. तर ३८६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः तरुणांचा मृत्यूची संख्या वाढल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. करवीर तालुक्यातील ४० गावे हॉटस्पॉट बनली आहेत. बेड मिळत नसल्याने रुग्ण होम आयसोलेशन होत आहेत. उपचार मिळण्यासाठी हयगय होत असल्याने डेथ रेट वाढला आहे.

Web Title: Corona's death rate in Karveer is dangerous