हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील यशवंतनगर वसाहतीतील लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल परिसरातील एक महिला कोरोनाबाधित झाल्याचा वैद्यकीय अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला आहे. परिणामी शहरांत कोरोनाचा पुन्हा प्रवेश झाल्याने भीती पसरली आहे. दरम्यान, कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करा, कोरोनाबाबत दक्ष राहा, पण घाबरू नका... असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या महिलेची प्रकृती बरी नसल्याने शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला कोरोनाबाबतची लक्षणे जाणवू लागताच डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. आज सायंकाळी त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल नगरपरिषद प्रशासनाला प्राप्त झाला.
हुपरीत एका महिलेला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST