यड्रावमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:33+5:302021-01-08T05:18:33+5:30

ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजना शिरोळ प्रकल्प २ च्या जांभळी बीटअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व ...

Corona warriors felicitated at Yadrav | यड्रावमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

यड्रावमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजना शिरोळ प्रकल्प २ च्या जांभळी बीटअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माझी कन्या भाग्यश्री व कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याचे नियोजन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केले. हा कार्यक्रम प्रकल्पाच्या बालविकास अधिकारी संगीता गुजर व प्रणिता दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गावडे यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले. श्रावणी रेडेकर, अक्षरा प्रभावळकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे आदर्श विचार मांडले. कार्यक्रमास तलाठी नितीन कांबळे, पोलीस पाटील जगदीश सपकाळ, किरण एरंडोले, पद्मश्री भाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रूपाली हळाळे यांनी सूत्रसंचालन, तर मनीषा ढोबळे यांनी आभार मानले.

फोटो - ०५०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्ही. व्ही. गावडे, नितीन कांबळे, जगदीश सपकाळ, किरण एरंडोले, पद्मश्री भाटे, रूपाली हळाळे उपस्थित होत्या.

Web Title: Corona warriors felicitated at Yadrav