राजे संभाजी तरुण मंडळाकडून कोरोना योद्धांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:58+5:302020-12-30T04:30:58+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाकडून कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. कृती समितीचे चंद्रकांत पाटील यांनी ...

राजे संभाजी तरुण मंडळाकडून कोरोना योद्धांचा सत्कार
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाकडून कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. कृती समितीचे चंद्रकांत पाटील यांनी कोरोनामध्ये पोलिसांना सलग चार महिने रात्रीचा चहा दिला. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी परिरसतील रुग्णांवर उपचार करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता दृढ केल्याबद्दल डॉ. प्रदीप राऊत, डॉ. रोहन राऊत, डॉ. सतीश इंगवले यांचा सत्कार केला. महापालिका कर्मचारी सचिन जाधव, अशोक साळोखे, प्रताप उगळे,
दिलीप शिंगडे यांच्यासह सफाई कर्मचारी गौतम सरवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत यादव, ॲड. अमित च्वहाण यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक बाळासो बोंद्रे, आनंद चौगुले, प्राचार्य विलासराव पोवार, सेक्रेटरी सतिष कुसुंबे, मनोज चौगुले, निवास शिंदे उपस्थित होते.
फोटो : कोल्हापूर, शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाकडून कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.