आई-बाबा फौंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:56+5:302021-02-05T07:05:56+5:30
यावेळी मानपत्र, चांदीची मुद्रा देऊन कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी स्वागत केले. स्वत:सह कुटुंबातील १४ जण ...

आई-बाबा फौंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
यावेळी मानपत्र, चांदीची मुद्रा देऊन कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी स्वागत केले. स्वत:सह कुटुंबातील १४ जण पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे रुग्णसेवा केली, त्या घटनेने भारावून आपण आई-बाबा ट्रस्टची स्थापना केल्याचे काणेकर यांनी सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, आई-बाबा ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम काणेकर कुटुंबीयांनी केले आहे. नगरपंचायतीसाठी मिळविलेल्या पाच कोटी ६५ लाखांच्या विकास निधीचेही समसमान वाटप करून काणेकर यांनी नि:स्वार्थ वृत्ती जपण्याचे दुर्मीळ काम केले आहे. माजी मंत्री भरमू पाटील, सभापती अॅड. अनंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, पत्रकार, आदींचा मानपत्र देऊन गौरव झाला.
यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, नगरसेवक दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडूकर, अरुण पिळणकर, शिवानंद हुंबरवाडी, बाबूराव हळदणकर, राजेंद्र परीट, आदी उपस्थित होते. एम. टी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संजय चंदगडकर यांनी आभार मानले.
------------------------
फोटो ओळी :
चंदगड येथे आई-बाबा फौंडेशनतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांचा आमदार राजेश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, दयानंद काणेकर, सभापती अनंत कांबळे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २४०१२०२१-गड-०४