हलकर्णी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:51+5:302021-02-05T06:59:51+5:30
वैद्यकीय अधिकारी निमिता धबाले यांचा सत्कार सविता चौगुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कोरोना काळात ...

हलकर्णी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
वैद्यकीय अधिकारी निमिता धबाले यांचा सत्कार सविता चौगुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कोरोना काळात रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असा अजेंडा घेऊन बाहेर पडलेल्या रणरागिणींनी कोरोना काळात हॉटस्पॉटकडे वाटचाल करणाऱ्या कार्यक्षेत्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र प्रयत्न करून कोरोनाचे प्रमाण शून्यावर आणल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला.
यावेळी बाळाबाई कोळी, आरोग्यसेविका अर्चना शिंदे, राजश्री सूर्यवंशी, रमेश गोकावी, सरिता गोडसे, राजश्री गोंडा, सावित्री शिंदे, स्वप्निल गावित, पुंडलिक येणेचवंडी, सावित्री जाधव आदी उपस्थित होत्या.
अमानुल्ला मालदार यांनी प्रास्ताविक केले. एम. ए. शिंदे यांनी आभार मानले.
-------------------
* फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे डॉ. निमिता धबाले यांचा सत्कार करताना सविता चौगुले व कर्मचारी.
क्रमांक : ०२०२२०२१-गड-०१