शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

corona virus : जिल्ह्यात तीन तालुक्यांत नवीन एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:58 IST

corona virus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वेगाने बदलत असून शुक्रवारी नवीन १३२ इतक्या नीचांकी रुग्णांची नोंद झाली; तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही; तर तीन तालुक्यांत प्रत्येकी आठ, दोन तालुक्यांत प्रत्येकी सहा, तीन तालुक्यांत प्रत्येकी चार, तर आजरा तालुक्यात केवळ एकच नवीन रुग्ण आढळून आला.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन तालुक्यांत नवीन एकही रुग्ण नाहीतीन तालुक्यात आठ, तीन तालुक्यांत चार; तर दोन तालुक्यांत सहा नवीन रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वेगाने बदलत असून शुक्रवारी नवीन १३२ इतक्या नीचांकी रुग्णांची नोंद झाली; तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही; तर तीन तालुक्यांत प्रत्येकी आठ, दोन तालुक्यांत प्रत्येकी सहा, तीन तालुक्यांत प्रत्येकी चार, तर आजरा तालुक्यात केवळ एकच नवीन रुग्ण आढळून आला.कोल्हापुरातून कोरोना संसर्ग जवळपास आता हद्दपार होण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा अशा तीन तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. कागल, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी चार, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी आठ, भुदरगड व करवीर तालुक्यांत प्रत्येकी सहा नवीन रुग्णांची नोंद झाली. आजरा तालुक्यात तर एकाच रुग्णाची नोंद झाली.१० पैकी चार मृत बाहेरच्या जिल्ह्यातीलगेल्या २४ तासांत जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यांतील चार रुग्ण मुंबई, सातारा, सांगली, बेळगाव येथील आहेत; तर करवीर तालुक्यातील नागदेववाडी, पेटकरवाडी, शाहूवाडीतील उखळू, शिरोळमधील धरणगुत्ती, भुदरगडमधील सोनाळी येथील रुग्णांचा मृतांत समावेश आहे. मृतांमध्ये तीन महिला आहेत.लवकरच कोरोनामुक्त जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण असेच राहिले आणि बरे होण्याचे प्रमाण वाढले तर घटस्थापनेच्या आधीच कोल्हापूर कोरोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर होईल.चाचण्यांचा तपशील असा-चाचण्यांचा प्रकार         एकूण चाचण्या   निगेटिव्ह       पॉझिटिव्ह१. आरटीपीसीआर             - १५६५                 १५३३               ३१२. ॲन्टिजेन -                       १९८                   १७५               २३३. खासगी लॅब                     ३४५                     २६७               ७८तालुकानिहाय रुग्णसंख्या -आजरा -८१२, भुदरगड - ११६८, चंदगड - १११०, गडहिंग्लज - १३२८, गगनबावडा - १३१, हातकणंगले - ५०६९, कागल - १५९५, करवीर - ५३७४, पन्हाळा - १७८१, राधानगरी - ११९३, शाहूवाडी - १२४२, शिरोळ - २३८९, नगरपालिका हद्द - ७१६५, कोल्हापूर शहर - १४०८३, इतर जिल्हा - २०६९. 

  • एकूण रुग्णसंख्या - ४६ हजार ५०९
  • कोरोनामुक्त रुग्णसंख्या - ३८ हजार ८१२
  • एकूण मृत रुग्णांची संख्या - १५३५
  •  रुग्णालयांत उपचार घेणारे रुग्ण - ६१६२
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर