शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:22 IST

आरोग्य सेतू अ‍ॅपमधून मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज तालुक्यातील ३६ गावे कोविड हॉटस्पॉट घोषित झाली आहेत. या गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी घर टू घर फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षणगटविकास अधिकारी शरद मगर यांची माहिती

गडहिंग्लज : आरोग्य सेतू अ‍ॅपमधून मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज तालुक्यातील ३६ गावे कोविड हॉटस्पॉट घोषित झाली आहेत. या गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी घर टू घर फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.गडहिंग्लज तालुक्यात वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांची उपस्थिती होती.ग्रामीण भागातील सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या नावांची गावनिहाय याद्या तयार केल्या आहेत. त्यानुसार स्वॅब तपासणी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तालुका पातळीवर खास पथक नेमण्यात आले असून पॉझिटिव्ह रूग्णांच्या थेट आणि प्रथम संपर्कातील रूग्णांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.हॉटस्पॉट गावांमधील सर्व्हेसाठी लागणारे थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. खाजगी डॉक्टर, औषध दुकानदार यांचे व्हॉटस अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर सोपविण्यात आली. फेर सर्व्हेक्षण आणि तपासणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.फेर सर्व्हेक्षणाची यंत्रणा अशीफेर सर्व्हेक्षणासाठी ४५० शिक्षक, २८५ अंगणवाडी सेविका, १९२ आशा स्वंयसेविका आणि २७२ मदतनीस काम करणार आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांना आणण्यासाठी २ रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजनामास्क, सुरक्षित अंतर याबाबत जनजागृती करण्यासह अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आणि बुस्टर डोस देण्याची व्यवस्था केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधित गावे आणि पॉझिटिव्ह रूग्णांची घरे सोडीअम हायफोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असेही मगर यांनी सांगितले.ही आहेत संभाव्य हॉटस्पॉट गावेदुंडगे, हनिमनाळ, हसूरचंपू, भडगाव, चन्नेकुप्पी, गिजवणे, वडरगे, महागाव, कळविकट्टी, करंबळी, नेसरी, इंचनाळ, हेब्बाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, बुगडीकट्टी, बसर्गे, हलकर्णी, सांबरे, तेरणी, कडलगे, नांगनूर, नूल, येणेचवंडी, मुत्नाळ, हडलगे, हिटणी, कानडेवाडी, खणदाळ, मांगनूर तर्फ सावतवाडी, नौकूड, निलजी, कडगाव, हरळी बुद्रूक, औरनाळ, जरळी, लिंगनूर काानूल 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर