शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : चार महिन्यांनी सलून सुरू, एस.टी. धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:07 IST

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देचार महिन्यांनी सलून सुरू, एस.टी. धावली

कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. शहरात दीड हजार आणि जिल्ह्यात पाच हजारांच्या आसपास सलून दुकाने आहेत. याशिवाय जिल्हाअंतर्गत एस. टी. बसेसची सुविधा सुरू झाली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून सलून व्यवसाय बंद होता. जूनमध्ये १५ दिवस व्यवसाय करायला परवानगी दिली गेली. त्यानंतर मात्र पुन्हा शासनाने बंदी आदेश काढला; त्यामुळे जेमतेम काही दिवस सलून चालवून ते पुन्हा बंद करण्यात आले. शनिवारपासून मात्र अनलॉकअंतर्गत सलून व्यावसायिकांना सुरक्षेची सगळी काळजी घेत व्यवसायास परवानगी दिल्याने जिल्ह्यात पुन्हा सलून सुरू झाले.सध्या मात्र जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असून, शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनाही भीती असल्याने त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत व्यवसाय सुरू केला आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी सगळ्यांना वेळा दिल्या जात आहेत.ग्राहक आत येताना त्यांना सॅनिटायझर देऊन, थर्मल गनद्वारे तपासणी, मास्क, फेस शिल्ड आणि पीपीई किट घालूनच ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

गेले चार महिने नाभिक बांधवांनी अतिशय अडचणीत दिवस काढले आहेत. आज व्यवसाय सुरू झाला आहे, तरी नागरिकांमध्ये भीती असल्याने अपेक्षित प्रमाणात ग्राहक येत नाहीत. त्यांच्याप्रमाणे आम्हांलाही कुटुंबीयांची काळजी आहे. त्यामुळे आम्हीदेखील खबरदारी घेत आहोत.- श्रीकांत झेंडे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकानमालक संघ

एस.टी.च्या मोजक्याच फेऱ्यालॉकडाऊननंतर १० दिवसांनी एस.टी. बसेसच्या जिल्हाअंतर्गत फेऱ्या शनिवारपासून सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्यात तीन ते चार बसेस सोडण्यात आल्या. शनिवार असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. आज रविवार आहे. उद्या, सोमवारी राखी पौर्णिमा असल्याने त्या दिवशी अधिक प्रवासी असण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा बसेस सोडल्या जातील, अशी माहिती अधिकारी रोहन पलंगे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरstate transportएसटी