शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

corona virus : रेमडेसीविर इंजेक्शन्स संपली, रुग्णांचे नातेवाईक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:34 IST

कोरोनामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन्सची गेले आठ दिवस टंचाई भासत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देरेमडेसीविर इंजेक्शन्स संपली, रुग्णांचे नातेवाईक हवालदिलआठ दिवसांची प्रतीक्षा, कंपन्यांकडून पुरवठ्याच्या मर्यादा

कोल्हापूर : कोरोनामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन्सची गेले आठ दिवस टंचाई भासत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.जिल्हा परिषदेने कंपन्यांकडे ५ हजार इंजेक्शन्सची मागणी केली आहे. मात्र, अजूनही ही इंजेक्शन्स आलेली नाहीत. तसेच खासगी रुग्णालयांनीही मागणी केली असली तरी त्यांनाही पुरवठा झालेला नाही. आतापर्यंत प्रशासनाने १२ हजार इंजेक्शन्सवर ४ कोटी ७ लाख रुपये खर्च केले आहेत.कोरोना रुग्णांसाठी ही इंजेक्शन्स उपयुक्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात या इंजेक्शन्सचे वितरण सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेमार्फत ही वितरण व्यवस्था उभारण्यात आली.

या ठिकाणी नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल, संबंधित रुग्णालयाचे पत्र आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकातील तीनपैकी एका डॉक्टरांचे शिफारसपत्र, आधारकार्डची झेरॉक्स दिल्यानंतर हे इंजेक्शन मोफत दिले जात होते. ३३०० रुपये एका इंजेक्शनची किंमत आहे.मात्र ८ हजारांहून अधिक इंजेक्शन्स मोफत वाटल्यानंतर केवळ गोरगरीबच नव्हे, तर श्रीमंत लोकही येथूनच इंजेक्शन्स घेत असल्याचे दिसून आले. अनेक रुग्णालयांनीही गरजेपेक्षा अधिक इंजेक्शनची गरज असल्याचे लेखी दिल्याचेही लक्षात आले.

ही संख्या वाढतच निघाल्याने अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीच ही इंजेक्शन्स मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील सरसकट वितरण थांबवण्यात आले आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून ही इंजेक्शन्स आलेलीच नाहीत. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्सकडून याची रोज मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींना फोन केले जात आहेत. मात्र, साठाच संपल्यामुळे अधिकारीही काही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दहा दिवसांपूर्वी आॅर्डर नोंदवूनही अजून इंजेक्शन्स उपलब्ध झालेली नाहीत. याच पद्धतीने खासगी रुग्णालयांनीही या इंजेक्शन्ससाठी त्यांच्या पातळीवर मागणी केली आहे, परंतु अजून त्यांनाही ती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.बीएमडब्ल्यू घेऊन इंजेक्शनसाठीजेव्हा जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातून सरसकट ही इंजेक्शन्स मोफत देणे सुरू होते. तेव्हा अनेक धनवान नागरिकांनी आपल्या नातेवाइकांसाठी या ठिकाणी धाव घेतली. बीएमडब्ल्यू गाडी घेऊन ही इंजेक्शन्स नेण्यासाठी नागरिक येथे रांगेत उभारल्याचे चित्र पहावयास मिळू लागले. अखेर हे सर्व चित्र पाहिल्यानंतर केवळ शासकीय रुग्णालयांसाठी ही इंजेक्शन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खासगी रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समधून या इंजेक्शन्सची मागणी वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुरवठा कमी पडत आहे. सर्वत्रच मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे, परंतु येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात ही इंजेक्शन्स येण्याची शक्यता आहे.मदन पाटील, संघटक सचिव, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंkolhapurकोल्हापूर