शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:35 IST

कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेगभाजीपाल्यासह कांदा-बटाटा, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

 कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, शाहूपुरी, राजारामपुरी, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, आदी परिसर फुलला होता.कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीसुद्धा काही ना काही कारण काढून अनेकजण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन फिरत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे संसर्ग होऊ लागला आहे.

हा रोखण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजने पुढाकार घेत प्रथम व्यापारी, उद्योजकांच्यावतीने आज, शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या सहा दिवसांमध्ये कुटुंबाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, याकरीता गेल्या दोन दिवसांपासून अनेकजणांनी कडधान्ये, धान्य व कांदा बटाटा, भाजीपाला आणि नियमित लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक किराणा व घाऊक धान्य व्यापाऱ्यांकडे रांगा लावून खरेदीसाठी गर्दी केली होती.

विशेषत: कोरड्या वस्तूंना मागणी अधिक होती. अनेकांनी गहू घेण्याऐवजी तयार गव्हाच्या पिठाला प्राधान्य दिले. तर तांदूळ, जोंधळा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. विशेष म्हणजे मूग, मसूर, मटकी, चवळी ,काळा वाटाणा या कडधान्यांला मागणी अधिक होती. बाजारपेठेत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी खरेदीला गर्दी कमी होती.शाहूपुरी परिसरातील पाचवी गल्लीसह शहरातील दुचाकी व चारचाकी मॅकेनिककडे आपली वाहने दुरूस्ती करून घेण्यासाठी इतर दिवसांच्या तुलनेत वाहनधारकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात जत्रेचे स्वरुप आले होते. इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानेही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.जीवनावश्यक वस्तूंबरोबर फळांनाही मागणी वाढलीतापासह सर्दी, खोकला आदींमुळे अनेकांना अशक्तपणा आला आहे. त्यातून बरे होण्यासाठी जशी औषधांची गरज आहे. त्याप्रमाणेच फळांचीही आवश्यकता असते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, बाजारगेट आदी परिसरातील फळ विक्रेत्यांकडे लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली . विशेषत: सफरचंद, डाळिंब, संत्री, ड्रॅगन फ्रूट, किवी, पपई या फळांना अधिक मागणी होती. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर