शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
3
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
4
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
5
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
6
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
7
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
8
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
9
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
10
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
12
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
13
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
14
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
15
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
16
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
17
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
18
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
19
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
20
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्ह्यातील २० चेकपोस्ट नाक्यांवर प्रवाशांची ‘कोरोना’ तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:56 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २० चेकपोस्ट नाक्यांवर प्रवाशांची ‘कोरोना’ तपासणीपथकाकडून प्रबोधनपर माहिती

कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

यावेळी महसूल, आरोग्य, ग्रामविकास व पोलीस यांच्या पथकाने वाहनांमध्ये जाऊन प्रवाशांना प्रबोधनपर माहिती दिली. किणी टोलनाका, कोगनोळी टोलनाका, गगनबावडा, राधानगरी, आंबा घाट, आदी प्रमुख नाक्यांवर ही तपासणी झाली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करावेत. तसेच या ठिकाणी महसूल, आरोग्य, ग्रामविकास व पोलीस पथकाच्या माध्यमातून वाहनांतील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोना आजाराविषयी प्रबोधनपर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

शुक्रवारी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह तालुक्याच्या ठिकाणी २० चेकपोस्ट नाके स्थापन करून तपासणी सुरू करण्यात आली. यामध्ये पन्हाळा, भुदरगड व करवीर तालुक्यांना राज्य किंवा जिल्ह्याच्या सीमा लागत नसल्याने या ठिकाणी नाके स्थापन करण्यात आलेले नाहीत.यामध्ये महसूल, आरोग्य व पोलीस यांच्या पथकांनी प्रथम अन्य जिल्ह्यांतून व अन्य राज्यांतून आलेल्या प्रवासी वाहनांना तपासणीसाठी थांबविले. त्यानंतर या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताप, खोकला व सर्दी, आदी कोरोना विषाणूसदृश लक्षणे आहे का, हे तपासण्यात आले. तसेच प्रवाशांचे कोरोनाविषयी समुपदेशन व प्रबोधन करण्यात आले. प्रवाशांची माहिती घेतलेला अहवाल संबंधित पथकाकडून तहसीलदारांकडे सादर केला जाणार आहे.

आंतरराज्य, आंतरजिल्हा तपासणी नाक्यांची नावेतालुका           तपासणी नाक्यांची ठिकाणे

  • आजरा           बहिरेवाडी, शिनोळी
  • चंदगड           दड्डी, कोवाड
  • गडहिंग्लज    हिटणी नाका, हलकर्णी, हेब्बाळ-जलद्याळ
  • कागल            लिंगनूर, कोगनोळी, मांगूर फाटा
  • शिरोळ           शिवनाकवाडी, पाच मैल फाटा, उदगाव
  • हातकणंगले    बोरगाव रोड, पंचगंगा पूल, शिवाजीनगर, कि णी टोलनाका
  • शाहूवाडी          आंबा, अणुस्कुरा
  • गगनबावडा      गगनबावडा
  • राधानगरी        दाजीपूर

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर