शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:51 IST

गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील ९३ पैकी ४८ गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गावातील गणेशोत्सव मंडळे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

ठळक मुद्दे गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!पोलिस दलाकडून जनजागृती मोहिम, ९३ पैकी ४८ गावांत झाले एकमत

राम मगदूम

गडहिंग्लज  : गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील ९३ पैकी ४८ गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गावातील गणेशोत्सव मंडळे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.१९९० च्या दशकात जिल्ह्यात सर्वप्रथम गणराया अ‍ॅवॉर्ड आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेची सुरूवात गडहिंग्लज तालुक्यातूनच झाली. त्यामुळे गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच प्रबोधनपर देखावे साकारण्यात चढाओढ सुरू झाली.गेल्या २५ वर्षांपासून तालुक्यातील निम्या गावात हा उपक्रम राबविला जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित गावातदेखील हा उपक्रम राबविला जावा, यासाठी गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनि दिनेश काशीद व नेसरीचे सपोनि अविनाश माने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व मंडळांचे पदाधिकारी धडपडत आहेत. या गावांचा झाला निर्णयनेसरी, हलकर्णी, नूल, इंचनाळ, गिजवणे, तेगिनहाळ, तुप्पूरवाडी, नौकुड, चन्नेकुप्पी, अत्याळ, बेकनाळ, हसूरसासगिरी, ऐनापूर, इदरगुच्ची, माद्याळ, हनिमनाळ, हरळी बुद्रूक, चिंचेवाडी, मनवाड, हसूरवाडी, तनवडी, हणमंतवाडी, चंदनकूड, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, जखेवाडी, अरळगुंडी, वैरागवाडी, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, लिंगनूर तर्फ नेसरी, मुंगूरवाडी, दुगूनवाडी, मासेवाडी, जांभूळवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, सांबरे, कुमरी, यमेहट्टी, सरोळी, अर्जूनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, तारेवाडी, डोणेवाडी, हेळेवाडी, तावरेवाडी.गणेशोत्सव मंडळांची संख्या

  • गडहिंग्लज ग्रामीण -२१५
  • गडहिंग्लज शहर - ३९

 गडहिंग्लजमधून सुरूवातगडहिंग्लजचे तत्कालीन सपोनि दिलीप कदम यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम गडहिंग्लज तालुक्यात गणराया अ‍ॅवॉर्ड आणि एक गाव..एक गणपती हा उपक्रम सुरू केला. त्यावेळी बक्षीस वितरणासाठी आलेले तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख भगवानराव मोरे व माधव सानप यांना ही संकल्पना आवडली. त्यानंतर सानप यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबविला.गडहिंग्लज शहराकडे लक्ष१९५६ मध्ये स्थापन झालेले काळभैरव गणेशोत्सव मंडळ हे गडहिंग्लज शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ असून आज शहरात ३९ मंडळे आहेत. डॉल्बीमुक्तीनंतर पुरोगामी गडहिंग्लज शहरात कोरोनाला हरवण्यासाठी यावर्षी एकच गणपती बसविण्यासाठी मंडळांच्या हालचाली सुरू आहेत. खिलाडूवृत्तीने विधायक वाटचाल करणारी मंडळे या उपक्रमालाही नक्कीच प्रतिसाद देतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस